Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांचा नागरिकांशी संवाद

कोरोना संदर्भातील समस्यांवर ऑनलाइन चर्चा

खारघर ः रामप्रहर वृत्त
कोरोना काळात उद्भवणार्‍या विविध समस्यांसंदर्भात भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकताच खारघर व तळोजातील नागरिकांशी ऑनलाइन संवाद साधला. या वेळी त्यांनी सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले.  
कोविड-19 विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे राज्यात लॉकडाऊनसदृश निर्बंध असल्याने अनेकांच्या रोजंदारी व दैनंदिन जीवनावर याचा विपरीत परिणाम होत असतानाच, पनवेल महापालिकेतील खारघर विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अतिशय भयावह होत गेली. अचानकपणे बाधितांची संख्या वाढल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना रुग्णालयात व्हेंटिलेटर, आयसीयू व ऑक्सिजन बेड मिळवताना खूप कष्ट सोसावे लागले. त्यातच रेमिडीसीवीर इंजेक्शन व ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला. नागरिकांना होणार्‍या या दूरवस्थेची जाणीव संवेदनशील आमदार प्रशांत ठाकूर यांना होती. यासाठीच खारघरमधील सेक्टर 2 ते तळोजा फेज 1 धील विविध सोसायट्यांचे अध्यक्ष व सचिव यांच्याशी त्यांनी रविवारी (दि. 9) वेबेक्स अ‍ॅपद्वारे ऑनलाइन संवाद साधला.
बेड मिळवताना येणार्‍या अडचणी, लसीकरण केंद्रांची अपुरी संख्या, अयोग्य निर्जंतुकीकरण, औषधांचा तुटवडा, कोविड केअर सेंटरची संख्या वाढविणे, रुग्णवाहिकेची आवश्यकता, भविष्यात येऊ पाहणार्‍या तिसर्‍या कोरोना लाटेसंदर्भात घ्यावयाची काळजी तसेच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कशी कमी होऊ शकेल? अशा विविध समस्या या वेळी मांडण्यात आल्या. अनेक प्रश्नांची आमदार प्रशांत ठाकूर यांनी समाधानकारक उत्तरे दिली, तसेच नागरिकांकडून आलेल्या सूचना लक्षात घेऊन यावर लवकर तोडगा काढला जाईल व पुन्हा 15 दिवसांनी पुन्हा याच विषयावर ऑनलाइन बैठकीद्वारे संवाद साधण्याची ग्वाही दिली.
या ऑनलाइन बैठकीत भाजप खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सभापती अनिता पाटील, नगरसेवक अभिमन्यू पाटील, हरेश केणी, प्रवीण पाटील, शत्रुघ्न काकडे, रामजी बेरा, अ‍ॅड. नरेश ठाकूर, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, नेत्रा पाटील, संजना कदम, आरती नवघरे, शहर उपाध्यक्ष दिलीप जाधव, सरचिटणीस दीपक शिंदे, किर्ती नवघरे, गीता चौधरी, मोना अडवाणी, समीर कदम, वासुदेव पाटील यांच्यासह विविध सोसायट्यांचे अध्यक्ष व सचिव यांनी सहभाग घेतला.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply