Breaking News

विकासकामांसंदर्भात पनवेल महापालिकेत आढावा बैठक

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल मनपा कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकासकामांसंदर्भात आढावा बैठक मंगळवारी (दि. 28) आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. दोन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तीन प्रभाग कार्यालये बांधण्याबाबतचे अंदाजपत्रक तयार करणे, अहिल्याबाई होळकर भवन आणि माता-बाल संगोपन केंद्राचे संकल्प चित्राचा प्रस्ताव तयार करणे, रोज बाजारांच्या निविदा तयार करणे ही सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने बांधकाम विभागास आयुक्तांनी सूचना दिल्या. या वेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, सहाय्यक संचालक नगररचना ज्योती कवाडे, उपायुक्त विठ्ठल डाके ,उपायुक्त गणेश शेटे, उपायूक्त सचिन पवार, उपायुक्त कैलास गावडे, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर,मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी. मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, लेखापरिक्षक विनकुमार पाटील, लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे यांच्यासह पालिकेतील सर्व विभांगाचे विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते. अतिक्रमण निष्कासन मोहिम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना आयुक्तांनी चारही प्रभाग अधिकार्‍यांना बैठकित दिल्या.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply