पनवेल : रामप्रहर वृत्त
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेलमधील अत्यंत गरजू अशा 10 महिला व 10 पुरुष रिक्षाचालकांना आर्थिक मदत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 13) देण्यात येणार आहे. राज्यात निर्बंधांच्या काळात रिक्षाचालकांना दीड हजाराचे अर्थसहाय्य दिले जाईल, असे राज्य सरकारने जाहीर केले होते, मात्र अद्याप मदतीची रक्कम रिक्षाचालकांना मिळाली नसून हे पैसे मिळणार कधी, याकडे रिक्षाचालकांचे लक्ष लागले आहे. याची जाणीव ठेवूनच राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने ही मदत केली जाणार आहे. या मदतीची गरज असलेल्या रिक्षाचालक बंधू – भगिनींनी संतोष आमले 9220403509 यांना संपर्क करावा, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.