मिनिडोरला इंडिगोची धडक

एका महिलेचा जागीच मृत्यू, 7 प्रवासी जखमी

माणगाव : प्रतिनिधी : माणगाव-निजामपूर रस्त्यावर खर्डी गावाच्या हद्दीत रविवारी (दि. 14) संध्याकाळी मिनिडोर रिक्षाला विरुध्द दिशेने आलेल्या  इंडिगो कारने जोरदार धडक दिली. या अपघातात मिनिडोर पलटी होऊन त्यातील एक महिला प्रवासी जागीच ठार झाली, तर 7 प्रवासी जखमी झाले. त्यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हसनमिया फटकारे (30, रा. निजामपूर, ता. माणगाव) हे आपल्या ताब्यातील मिनिडोर रिक्षा (एमएच-06,एस-4159) प्रवासी भरून रविवारी संध्याकाळी माणगावकडून निजामपूरकडे घेऊन जात होते. खर्डी गावाच्या हद्दीत निजामपूर बाजूकडून आलेल्या इंडिगो कारने (एमएच-01,सीआर-6067) विरुध्द दिशेने येऊन मिनिडोरला धडक दिली. या अपघातात मिनिडोर पलटी होऊन त्यात बसलेली महिला प्रवासी सुंदरा केशव हिलम  (वय 40, रा. वाकी आदिवासीवाडी ता. माणगाव) हिला गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला, तर  रोहित केशव हिलम (वय 7), विकास मधू वाघमारे, मनीषा मधू वाघमारे (वय 35, सर्व रा. वाकी आदिवासीवाडी), सुजाता सुधीर धाडवे (वय 55), पांडुरंग भिकाजी गायकवाड (वय 65, दोन्ही रा. हरवंडी ता. माणगाव), संजित खोखाम मंडळ (वय 35, रा. वांद्रे, मुंबई), नरेश गणपत पवार (वय 20, रा. होडगाव आदिवासीवाडी) हे प्रवासी जखमी झाले. या प्रकरणी मिनिडोरचालक हसनमिया फटकारे यांच्या फिर्यादीनुसार माणगाव पोलीस ठाण्यात कारचालक संजित मंडळवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало Аналитические функции на платформе 1xbet зеркало предоставляют пользователям …

Leave a Reply