Breaking News

खारघरच्या सरस्वती कॉलेजमध्ये लसीकरणास मान्यता

पनवेल : प्रतिनिधी

शासनाने नवीन निश्चित केलेल्या धोरणानुसार 1 मे 2021 पासून खासगी लसीकरण केंद्रांना स्वतः उत्पादकाकडून लस खरेदी करून कोविन पोर्टलचा वापर करून लसीकरण कार्यक्रम राबविण्यास मान्यता दिली आहे. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात अपोलो रुग्णालयाला सरस्वती कॉलेज खारघर येथे खासगी लसीकरण केंद्र (पीसीव्हीसी) सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सध्या एकूण आठ ठिकाणी 45 वर्षांहून अधिक वयोगटातील व्यक्तींना लसीकरणाचा कार्यक्रम राबविला जात असून तीन केंद्रावर 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना लसीकरण केले जात आहे. नवीन निश्चित केलेल्या धोरणानुसार 1 मे 2021 पासून खासगी लसीकरण केंद्रांना शासनाच्या धोरणानुसार स्वतः उत्पादकाकडून लस खरेदी करून लसीकरण कार्यक्रम कोविन पोर्टलचा वापर करून राबविण्यास मान्यता दिली आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली लसीकरणाचे नागरी टास्क फोर्स असून मंगळवारी (दि. 11) झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये अपोलो रुग्णालयाला त्यांच्या मागणीचा विचार करून सरस्वती कॉलेज खारघर येथे खासगी लसीकरण केंद्र (पीसीव्हीसी) सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. लवकरच या ठिकाणी उचित शुल्क घेऊन लसीकरण कार्यक्रम राबविला जाईल. 1 मे पूर्वी सुरू असलेल्या परंतु सध्या बंद असलेल्या 13 खासगी रुग्णालयाना त्यांनी स्वतः लस खरेदी करून त्यांच्या केंद्रांमध्ये लसीकरण सुरू करण्यास सुध्दा मंजूरी देण्यात आलेली आहे. या लसीकरण ठिकाणी संबंधित रुग्णालयांनी स्वतः उत्पादकाकडून लस खरेदी करून कोविन अ‍ॅपवर नोंदणी करून लसीकरण करता येईल.

-मनपा हद्दीतील खासगी कोविड लसीकरण केंद्र

एमजीएम मेडिकल कॉलेज, कामोठे, वायएमटी मेडिकल कॉलेज, खारघर, कॅलॅड्रीयस मल्टिस्पेशालिटी हॉस्पि., देवीचा पाडा, तळोजा,पनवेल हॉस्पिटल, पनवेल, श्री साई हॉस्पिटल, तळोजा, उन्नती हॉस्पिटल, पनवेल, एमजीएम मेडिकल कॉलेज, कळंबोली,लाईफलाईन हॉस्पिटल, पनवेल, बिरमोळे हॉस्पिटल, पनवेल, पटवर्धन हॉस्पिटल, पनवेल, श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल, कळंबोली सुअस्थ हॉस्पिटल, पनवेल, वेंकटेश हॉस्पिटल, तळोजा

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply