Breaking News

नगरसेविका सीता पाटील यांच्याकडून खांदा कॉलनी मास्क व धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

वाढत्या कोरोनामुळे राज्यात कडक निर्बंध लागू आहेत. त्यामूळे सर्व सामान्य लोकांचे नागरिकांचे हाल होत आहेत. ह्या परिस्थितीत खांदा कॉलनी परिसरातील प्रभाग 15 मधील भाजप ओबीसी महिला मोर्चा उत्तर रायगड अध्यक्ष तथा नगरसेविका सीता पाटील यांनी प्रभाग 15 मधील रहिवाशांना मास्कचे वाटप केले. या वेळी प्रभागातील गरीब व गरजू लोकांना धान्याचे वाटपही करण्यात आले.

नगरसेविका सीता पाटील यांनी झोपडपट्टी भागामध्ये सर्व रहिवाशांना त्यांच्या घरी जाऊन धान्य व भाजीपाला वाटप केले. सीता पाटील यांच्या स्वखर्चातून लोकांना मोठ्या प्रमाणात मदतीचा हात मिळत आहे.

कोरोना काळात रुग्णांना दवाखान्यात कोणतीही अडचण असल्यास त्या स्वत: जाऊन त्यांच्या अडचणी दुर करीत आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply