Breaking News

भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
इंग्लंडविरुद्धच्या सर्व प्रारूपांच्या मालिकेसाठी वरिष्ठ महिला निवड समितीने भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारताला इंग्लंडविरुद्ध एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळायचे आहेत. भारतीय महिला संघ 16 जूनपासून ब्रिस्टॉल येथे एकमेव कसोटी सामना खेळणार आहे.
कसोटी मालिकेनंतर पहिला एकदिवसीय सामना 27 जून रोजी ब्रिस्टॉलमध्ये, दुसरा सामना 30 जून रोजी टाँटन येथे व तिसरा सामना 3 जुलैला वॉरसेस्टर येथे होईल. यानंतर 9, 11 व 15 जुलै रोजी तीन टी-20 सामने खेळले जाणार आहेत.
कसोटी व एकदिवसीयचे नेतृत्व मिताली राज, तर टी-20 संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून वगळण्यात आलेल्या शिखा पांडे व तानिया भाटिया यांचे संघात पुनरागमन झाले. यष्टिरक्षक इंद्रानी रॉयला पदार्पणाची संधी मिळाली. लेफ्ट आर्म फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड अजूनही कोरोनातून बरी झाली नसल्याने तिची निवड झाली नाही.
कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी संघ

मिताली राज (कर्णधार), स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), पूनम राऊत, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, स्नेह राणा, तानिया भाटिया (यष्टिरक्षक),
इंद्राणी रॉय (यष्टिरक्षक), झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट आणि राधा यादव.
टी-20 सामन्यांसाठी संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, रिचा घोष, हार्लिन देओल, स्नेह राणा, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), इंद्राणी रॉय (यष्टिरक्षक), शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट, राधा यादव आणि सिमरन दिल बहादूर.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply