नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाने कोरोना चाचणीबाबत अफवा पसरवू नका, असे सांगितले आहे. माझी एक चाचणी पॉझिटिव्ह आणि एक चाचणी निगेटिव्ह आल्याचे साहाने सांगितले. अनेक माध्यमांनी साहाला पुन्हा कोरोना झाल्यासंबंधी शुक्रवारी वृत्त दिले होते. त्यानंतर साहाने प्रतिक्रिया दिली.
साहा दिल्लीत क्वारंटाइनमध्ये असून, त्याची प्रकृती आधीपेक्षा उत्तम आहे. साहा ट्विटमध्ये म्हणाला, माझा क्वारंटाइन कालावधी अजून संपलेला नाही. दैनंदिन चेकअप म्हणून दोन चाचण्या झाल्या आहेत. त्यातील एक निगेटिव्ह आहे आणि दुसरी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती उत्तम आहे. माझ्या कोरोना चाचण्यांबद्दल कोणतीही अफवा पसरवू नका, असे मी आवाहन करतो.
इंग्लंड दौर्यासाठी भारतीय संघाच्या 20 सदस्यांमध्ये संघात वृद्धिमान साहाचा समावेश करण्यात आला आहे. तो पूर्णपणे बरा झाल्यानंतर तो संघासह जाऊ शकेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याव्यतिरिक्त भारताला इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिकाही खेळायची आहे.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …