Breaking News

खोपोलीत तीन जण वाहून गेले

दोघांचे मृतदेह सापडले, एकीचा शोध सुरू


खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी
वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी झेनिथ धबधब्यावर गेलेल्या खोपोलीतील तीन पर्यटकांचा पाताळगंगा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना मंगळवारी (दि. 28) सायंकाळी घडली. यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून एका मुलीचा शोध सुरू आहे.
खोपोलीतील सुप्रसिद्ध झेनिथ धबधबा परिसरात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होऊन शहरातून वाहणार्‍या पाताळगंगा नदीला पूर आला होता.
अशातच खोपोली शहरातील 15 पर्यटक धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते. तुफान पर्जन्यवृष्टीमुळे ते परतीच्या मार्गावर असताना पाण्याची पातळी वाढल्याने तीन जण वाहून गेले. मेहरबानू खान (वय 40) रुबिना वेळेकर (40) आलमा खान (8) अशी बुडालेल्यांची नावे आहेत. यापैकी दोन महिलांचे मृतदेह सापडले असून, अलमा खान या मुलीचा शोध उशिरापर्यंत सुरू होता.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply