Breaking News

दिनेश कार्तिक समालोचकाच्या भूमिकेत

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

कोरोना विषाणू संसर्गामुळे आयपीएलचा 14वा हंगाम पुढे ढकलण्यात आला. आता टीम इंडियाचे खेळाडू आगामी इंग्लंड दौर्‍यासाठी सज्ज झाले आहेत, तर काही खेळाडू आगामी काळातील योजनांचा विचार करीत आहेत. अशात कोलकाता नाइट रायडर्सचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने आता नव्या क्षेत्रात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. कार्तिक इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या लीग ‘द हंड्रेड’मध्ये समालोचकाच्या भूमिकेत असेल. अधिकृत भागीदार स्काय स्पोर्ट्सने ‘द हंड्रेड’साठी समालोचकांचे पथक जाहीर केले आहे. कार्तिक व्यतिरिक्त अ‍ॅड्र्यू फ्लिटाँफ, स्टुअर्ट ब्रॉड, केव्हिन पीटरसन, कुमार संगकारा हेदेखील या पॅनेलमध्ये समाविष्ट आहेत. 21 जुलैपासून या लीगला सुरुवात होईल.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply