Breaking News

पनवेलचा ओम वर्मा ठरला टेनिस चॅम्पियन

रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा खेळाडू

पनवेल : रामप्रहर वृत्त
श्रीलंकेत झालेल्या एशियन टेनिस फेडरेशनच्या 14 वर्षांखालील आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ तसेच रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या ओम वर्मा या खेळाडूने जर्मनीच्या लुईस एलिह नीसे याला पराजित करून विजेतेपद पटकाविले.
श्रीलंकेतील कोलंबो झालेल्या एटीएफ 14 अंडर सिरीज या स्पर्धेत श्रीलंका, यूएसए, भारत, कोरिया आणि जर्मनीच्या खेळाडूंनी भाग घेतला होता. उपांत्यपूर्व फेरीत ओम वर्मा याने श्रीलंकेच्या आहिल मोहमद कलिल याला 6-2 आणि 6-2, तर उपांत्य फेरीत श्रीलंकेच्याच साहा कपिलसेना याला 6-2 व 6-3 या सरळ सेटने पराभव केला. 29 एप्रिलला झालेल्या अंतिम सामन्यात जर्मनीच्या खेळाडूचाही 6-3, व 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत ओम वर्मा ने बाजी मारली. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या उलवा नोड येथे असलेल्या रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स क्लबचा ओम सदस्य आहे. त्याच्या या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह विविध मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply