Breaking News

मोर्बा येथील बाजारपेठ पाच दिवस राहणार बंद

वाढत्या कोरोनामुळे ग्रामस्थांनी घेतला स्वयंस्फूर्तीने निर्णय

माणगाव ः प्रतिनिधी

संपूर्ण जगात हाहाकार उडविणार्‍या कोरोना महामारीने सारेजण मानसिक तणावाखाली आहेत.रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात 250हून अधिक रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून, तालुक्यातील मोर्बा गावात या महामारीने धुमाकूळ घातला आहे. या महामारीचा वाढता प्रादुर्भाव पाहून मोर्बा ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने आणखी पाच दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या संदर्भात उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर, तहसीलदार प्रियंका आयरे, माणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतिष गाढवे व पोलीस खाते यांना सांगून मोर्बा ग्रामपंचायत हद्दीत 19 मेपासून सलग पाच दिवस 23 मेपर्यंत अत्यावश्यक सेवा असलेली रुग्णालये, औषधांची दुकाने व दुध डेअरी वगळून इतर सर्वच दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बुधवारी मोर्बा गावात सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. हा बंद पुढेही 25 मेपासून ते 29 मेपर्यंत सलग पाच दिवस पाळण्यात येणार आहे.

मोर्बा गावच्या गेल्या अडीच महिन्यांत 14 जणांचा बळी कोरोना महामारीने गेल्याचे सांगत ज्या घरात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत त्या घरातील सर्व सदस्यांचे तसेच आजूबाजूच्या घरांतील लोकांची अँटिजेन टेस्ट करून घेण्यात येत असल्याची माहिती येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नरेश तरडे यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना दिली.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply