Breaking News

दुचाकीवरून जाणार्‍या इसमास जबर मारहाण

पनवेल : वार्ताहर

मोटरसायकलहून कामावरून घरी परतत असलेल्या एका इसमास अज्ञात त्रिकुटाने जबर मारहाण केल्याची घटना वावंजे परिसरात घडली आहे. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

फिर्यादी चंद्रशा मोनू राठोड (37 रा.वावंजे, एनके गार्डन) हे आपल्या मोटरसायकलीवरून कामावरून घरी परतत होते. पाठीमागून आलेल्या रिक्षाने त्यांना ओव्हरटेक करून तू आमच्यापुढे गाडी का घातलीस, असे विचारुन अज्ञात तिघांपैकी एकाने त्यांना जबर मारहाण केली. याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील गुरव अधिक तपास करीत आहेत.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply