Breaking News

विश्वजीत बारणेंच्या प्रचार फेरीला प्रतिसाद

रसायनी : रामप्रहर वृत्त

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांचे चिरंजीव विश्वजीत बारणे यांनी रसायनी परिसरातील बाजारपेठेचे मुख्य केंद्रबिंदू असणार्‍या मोहोपाडा व वावेघर बाजारपेठेतील दुकानदारांशी संवाद साधून रसायनी परिसर पिंजून काढला आहे.

 वडिलांच्या प्रचाराची धुरा विश्वजीतने हाती घेतल्याने रसायनीत त्यांना तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी विश्वजीतने परिसरातील दुकानदार व रसायनीकरांशी खुल्या मनाने संवाद साधून धनुष्यबाण निशाणीला मतदान करण्याचे आवाहन केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे. त्यांचे सुपुत्र विश्वजीत हे वडिलांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. विश्वजीत बारणे यांनी रविवारी सायंकाळी उशिरा मोहोपाडा येथे भेट दिली.सर्वप्रथम शिवाजी चौकातील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रचार कार्यास सुरुवात केली. या वेळी त्यांचे महायुतीच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने शिवसेना शाखेत स्वागत करून मोहोपाडा बाजारपेठेतून प्रचार सुरू झाला. या वेळी विश्वजीत बारणे यांच्यासोबत मोहोपाडा रसायनीतील शिवसेना -भाजप मित्रपक्ष महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्वजीत बारणे यांनी बाजारपेठेतील दुकानदारांशी संवाद साधून धनुष्यबाण निशाणीला मतदान करण्याचे आवाहन केले.त्यांच्यासोबत जिल्हा महिला आघाडीप्रमुख अनघा कानिटकर, उपतालुकाप्रमुख रमेश पाटील, विभागप्रमुख अजित सावंत, उपविभागप्रमुख कृष्णा पाटील, माजी सरपंच रोशन राऊत, माजी उपसरपंच सदगुणा पाटील, संदेश जाधव, दत्ता खाने, युवा सेनेचे संतोष पांगत, स्वप्निल राऊत आदींसह मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. वावेघर येथे श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांनी वडिलांनी केलेल्या विकासकामांचा आलेख वाचला.

Check Also

रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …

Leave a Reply