Breaking News

बॉक्सर सतीश कुमारची उपांत्य फेरीत धडक

टोकियो ः वृत्तसंस्था

भारतीय बॉक्सर सतीश कुमारने टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष सुपर हेवीवेट कॅटेगरीमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याने 16व्या फेरीत जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनला 4-1ने पराभूत केले. सतिशच्या या कामगिरीमुळे ऑलिम्पिकमध्ये पदकासाठी भारताच्या आशा उंचावल्या आहेत. पहिल्या फेरीत सतीशने प्रभावी खेळ करून पंचांची आणि उपस्थितांची मने जिंकली तर दुसर्‍या फेरीत त्याने अप्रतिम राईट हूक आणि बॉडी शॉट्स वापरून रिकोर्डोला चीत केले. पहिल्या दोन फेर्‍यांतच सतीशने रिकार्डोला गारद केल्याने तिसर्‍या फेरीत सतीशचा सामना करणे त्याला जवळपास अशक्य झाले, मात्र आघाडी घेतली असतानाही सतीशने कुठलाही धोका न पत्करता चतुराईने खेळत सामना जिंकला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. सतीश कुमार मुळचा बुलंदशहरमधील पचौता गावचा आहे. त्याने विविध स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply