Sunday , September 24 2023

प्रेयसीला ब्लॅकमेल करणारा प्रियकर गजाआड

चेन्नई ः वृत्तसंस्था

अल्पवयीन प्रेयसीचा अश्लील व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी देणार्‍या दोन युवकांना पोलिसांनी रविवारी अटक केली. पीडित मुलगी खासगी इंजिनिअरींग कॉलेजच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. चेन्नईत पल्लीकारानाय येथे राहणार्‍या जी. श्रीनाथ (20) नावाच्या मुलाबरोबर या मुलीचे प्रेमप्रकरण सुरू होते. प्रेमात असताना या मुलीने श्रीनाथला भरपूर गिफ्ट दिले. नेट बँकिंगद्वारे श्रीनाथच्या खात्यात पैसेसुद्धा ट्रान्सफर केले.

मागच्या महिन्यात श्रीनाथने या मुलीला भविष्याबद्दल बोलायचे आहे. आई-वडिलांशी भेट घडवून देतो, असे सांगून घरी बोलावले. मुलगी जेव्हा श्रीनाथच्या घरी गेली तेव्हा आईवडील घरी नव्हते. श्रीनाथने या मुलीचा अश्लील व्हिडीओ बनवण्याची योजना आखली होती. त्याप्रमाणे त्याने मुलगी येण्याआधी मित्राला घरातल्या स्टोअर रुममध्ये लपवून ठेवले होते. मित्राला त्याने प्रणय सुरू असतानाचे फोटो काढण्याची आणि व्हिडीओ बनवण्याची सूचना दिली होती. त्यानंतर त्याने या मुलीकडे पैशांची मागणी केली व तिला पुन्हा घरी येण्यास सांगितले.

जेव्हा तिने नकार दिला तेव्हा त्याने व्हिडीओ व फोटोबद्दल सांगितले. जेव्हा या मुलीने विश्वास ठेवण्यास नकार दिला तेव्हा त्याच्या मोबाइलमध्ये असलेला व्हिडीओ दाखवला. हा व्हिडीओ पाहून तिने लगेच त्याच्याबरोबरचे प्रेमसंबंध तोडून टाकले. त्यानंतर श्रीनाथ व त्याचा मित्र योगेशने या मुलीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. अखेर मुलीने धाडस करून आपल्या वडिलांना घडल्या प्रकाराबद्दल सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस स्थानकात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी श्रीनाथ आणि योगेश या दोघांना अटक केली आहे.

Check Also

महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव

महाड ः रामप्रहर वृत्त ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील …

Leave a Reply