Breaking News

शेतकर्यांना भात बियाणे, खते वाटप

उरण : वार्ताहर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करत उरण तालुक्यातील खोपटे-बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीतील शेतकर्‍यांना कृषी विभागातर्फे बांधावर भात बियाणांबरोबर खतांचे वाटप तालुका कृषी अधिकारी शर्मिला जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी शेतकर्‍यांनी भात बियाणे खरेदी करण्यासाठी आपली उपस्थिती लावली होती.

कृषी अधिकारी शर्मिला जाधव यांनी उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, नुकताच चक्रीवादळामुळे अवकाळी पाऊस पडला आहे. हा पाऊस पेरणी योग्य नाही. जून महिन्यात येणार्‍या पावसाळ्यात प्रत्येक शेतकर्‍यांनी आपआपल्या शेतात भात बियाणांची पेरणी करावी, तसेच तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात येणार्‍या सुचनांचे प्रत्येक शेतकर्‍यांनी पालन करत शेतीच्या मशागतीच्या कामांना सुरुवात करावी. अशा मशागतीच्या कामांमुळे निश्चितच खोपटा, कोप्रोली या परिसरातील गोर्‍या व खार्‍या पाण्याचे मिश्रण असलेल्या शेतजमिनीत भाताचे पीक मुबलक प्रमाणात येईल. शेतकर्‍यांनी नैसर्गिक खतांचा वापर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन शेवटी कृषी अधिकारी शर्मिला जाधव यांनी केले.

या वेळी तालुका कृषी पर्यवेक्षक एन. वाय. घरत, कृषी सहाय्यक एस. एस. अंबुलगेकर, बांधपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच विशाखा ठाकूर यांनी शर्मिला जाधव यांचे कौतुक केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply