Breaking News

समिरा गुजर यांनी जिंकली रोहेकरांची मने

रोहे : प्रतिनिधी : रामनवमीनिमित्त येथील स्वरसंवाद आणि भाटे सार्वजनिक वाचनालय या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 13) रोह्यामधील भाटे सार्वजनिक वाचनालयामध्ये ‘रघुनायका, मागणे हेचि आता‘ हा संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. या वेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

रोह्यातील अभिनेत्री समिरा गुजर यांच्या संकल्पनेतून आणि लेखणीतून साकारलेल्या ‘रघुनायका मागणे हेचि आता‘ या कार्यक्रमाचे पहिले पुष्प समिरा गुजर यांनी आपल्या जन्मगावातील रसिकांसमोर सादर केले. माजी नगरसेविका पूजा पोटफोडे यांनी समिरा गुजर यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील सांगीतिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालय सांस्कृतिक समिती अध्यक्ष निखिल दाते यांनी केले. वाचनालयाचे अध्यक्ष हेमंत तलवार, अमित गुजर यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply