Breaking News

श्रावणी अखेर सापडली

कर्जत : प्रतिनिधी : श्रावणी विष्णुकांत राठोड ही मुलगी कर्जतमधून राहत्या घरातून हरवली होती. पोलिसांनी लगेच सूत्रे हलविल्याने ती दहिवलीमध्ये सापडली. तिला तिच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले. या वेळी नायब तहसीलदार संजय भालेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, पोलीस प्रमोद पाटील आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

कर्जत शहरातील दुर्वांकुर अपार्टमेंटमध्ये विष्णुकांत राठोड कुटुंब राहत असून, त्यांची मुलगी श्रावणी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता घरातून हरवली, अशी तक्रार 12 एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप पुढील तपास करीत होते. सगळीकडे शोधमोहीम राबविण्यानंतर श्रावणी कर्जत दहिवली येथे आढळून आली.

Check Also

रोजगार महाकुंभला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय …

Leave a Reply