Breaking News

विजयाची परंपरा कायम राखणार, नवी मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार गणेश नाईक यांचा विश्वास

नवी मुंबई : बातमीदार

1995 पासून आजतागायत मागील पंचवीस वर्षे सुजाण नवी मुंबईकरांनी आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली पालिकेत सत्ता कायम राखली आहे. पालिकेच्या आगामी निवडणुकीत देखील नवी मुंबईकर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन सत्तेचा कौल आमच्या बाजूने देतील. 25 वर्षांची विजयाची परंपरा कायम राखणार असा विश्वास आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केला. ऐरोली मतदार संघाचे आमदार गणेश नाईक यांनी ऐरोली विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांचा पाहणी दौरा केला. त्यावेळी ते बोलत होते. या पाहणी दौर्‍यात त्यांनी विकास कामांना गती देण्याची सूचना अधिकार्‍यांना केली. नवी मुंबईचा आजवर झालेला विकास नवी मुंबईकरांनी अनुभवला आहे. पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, घनकचरा व्यवस्थापन सर्व क्षेत्रात नवी मुंबईने उल्लेखनीय विकास केला आहे आणि तो जनतेने पाहिला आहे, असे मत आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केले. ऐरोलीतील जैवविविधता केंद्रामध्ये सुमारे 30 कोटी रुपये खर्चून खारफुटी, फ्लेमिंगोंसह अन्य सागरी पक्षी, प्राणी माशांच्या प्रजातींची माहिती देणारे म्युझियम उभे राहणार आहे. याबाबत माजी आमदार संदीप नाईक यांनी पाठपुरावा केला होता. दिवा जेट्टीची लांबी वाचवून जेट्टीचे नुतनीकरण करण्याची सूचना नाईक यांनी केली. ऐरोली ते काटई या उन्नत मार्गावर नवी मुंबईत काटईच्या दिशेने आणि मुंबईच्या दिशेने चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका असावी यासाठी आमदार नाईक प्रयत्नात आहेत. ऐरोली येथील प्रस्तावित नाट्यगृहाचा पाहणी दौरादेखील आमदार नाईक यांनी केला. या वेळी माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी सभापती अनंत सुतार, माजी नगरसेवक अशोक पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply