Breaking News

सहा. पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी सर केला माऊंट एव्हरेस्ट

पनवेल ः वार्ताहर

नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करून महाराष्ट्र पोलीस दलाचा झेंडा फडकवला आहे. एव्हरेस्ट सर करणारे संभाजी गुरव हे महाराष्ट्र पोलीस दलातील तिसरे अधिकारी आहेत. गुरव यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांच्यावर नवी मुंबई पोलीस दलातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह व सहपोलीस आयुक्त डॉ. जय जाधव तसेच इतर वरिष्ठ अधिकार्‍यांनीही गुरव यांचे विशेष कौतुक केले आहे. 

गुरव यांना प्रथमपासूनच गिर्यारोहणाची आवड होती. ती त्यांनी पोलीस दलात भरती झाल्यानंतरही जोपासली. त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पची मोहीम पूर्ण केली होती. नंतर गेली दोन वर्षे सराव करून अखेर त्यांनी एव्हरेस्ट सर केले. उणे 19 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असलेल्या एव्हरेस्ट शिखरावर चढाई करताना गुरव यांनी काठमांडू येथून सुरुवात केली. एव्हरेस्ट बेस कॅम्पचा 65 किमीचा टप्पा त्यांनी पूर्ण करीत वातावरणाने साथ दिल्याने 23 मे रोजी एव्हरेस्ट शिखर सर केले.

यापूर्वी महाराष्ट्र पोलीस दलातील आयपीएस सुहेल शर्मा, औरंगाबाद येथील पोलीस कर्मचारी रफीक शेख यांनीही एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी केली आहे. संभाजी गुरव यांनी यापूर्वी गडचिरोली येथे पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केली. व्यायाम व शारीरिक क्षमता राखण्यावर त्यांनी कायम भर दिला.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply