Breaking News

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ः वार्ताहर

लायन्स क्लब पनवेल व पूज्य सिंधी पंचायत ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सिंधी पंचायत हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी 45 रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिराला उत्स्फू र्त प्रतिसाद दिला. सध्या सर्वत्र रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे पनवेल लायन्स क्लबच्या अध्यक्ष भावना जेसवानी व पूज्य सिंधी पंचायत समितीचे अ‍ॅड. मनोहर सचदेव यांनी सांगितले. या वेळी अध्यक्ष ला. भावना जेसवानी, सचिव ज्योती देशमाने, रिजन चेअरमन संजय गोडसे, संजय पोतदार, अशोक गिल्डा, राजेंद्र जेसवानी, नंदकिशोर धोत्रे, गौतम म्हस्के, सुरेश घाडगे, मुर्तुझा अफसर, शोभा गिल्डा, मीना पोतदार, स्वाती गोडसे, सुयोग पेंडसे, सुरभी पेंडसे, राजकुमार सचदेव, दौलत सचदेव आदी सभासद उपस्थित होते.

Check Also

न्हावाशेवा टप्पा ३ पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत बैठक

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती; कामांचा आढावा मुंबई : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या …

Leave a Reply