Breaking News

महापौर आणि सभागृह नेत्यांकडून कोविड रुग्णालयांची पाहणी

पनवेल ः प्रतिनिधी
कळंबोली येथील कोविड समर्पित रुग्णालय, एमजीएम रुग्णालय, तसेच भारतीय कपास निगमचे गोडाऊन येथे होणार्‍या प्रस्तावित जम्बो कोविड सेंटरला महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन तेथील सोयीसुविधांचा आढावा घेतला.
या वेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग ‘ब’ सभापती समीर ठाकूर, प्रभाग ‘क’ सभापती हेमलता म्हात्रे, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, नगरसेविका दर्शना भोईर, उपायुक्त संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, डॉ. भोईटे, डॉ. पंडित आदी उपस्थित होते.कोविडच्या दुसर्‍या लाटेत पनवेल महानगरपालिकेला सिडकोने कळंबोली येथे 72 बेडचे कोविड समर्पित रुग्णालय उपलब्ध करून दिले आहे.
या रुग्णालयाचा पनवेल कार्यक्षेत्रातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लाभ होत आहे.
या रुग्णालयासह एमजीएम रुग्णालयास महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेवकांनी भेट देऊन तेथील डॉक्टरांकडून रुग्णांना देण्यात येणार्‍या सोयीसुविधांची तसेच संभाव्य तिसरी लाट, म्युकरमायकोसिसबद्दल माहिती घेतली. सिडको भारतीय कपास निगमच्या गोडाऊनमध्ये महापालिकेला जम्बो कोविड सेंटर उभे करून देणार आहे. या जम्बो कोविड सेंटरच्या कामकाजाची पाहणीदेखील या वेळी करण्यात आली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply