Breaking News

मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर

चंदिगड ः वृत्तसंस्था

कोरोना संसर्गावर उपचार घेणारे दिग्गज अ‍ॅथलिट मिल्खा सिंग यांना आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे मिल्खा सिंग यांना काही दिवसांपूर्वी आयसीयूत दाखल करण्यात आले होते. ‘फ्लाइंग शीख’ म्हणून जगभरात ओळखले जाणारे मिल्खा सिंग कोरोनामुळे चंदिगड येथील आपल्या घरातच विलगीकरणात होते, मात्र अचानक प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मोहालीतील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना आयसीयूमधून जनरल वॉर्डात हलविण्यात आले आहे. 91 वर्षीय मिल्खा सिंग यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. कोरोना संक्रमित आढळल्यामुळे ते घरातच विलगीकरणात होते. मिल्खा सिंग यांच्यानंतर त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांनाही कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिल्खा सिंग आणि निर्मल कौर यांच्यावर एकाच रूममध्ये उपचार सुरू आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply