Breaking News

वादळग्रस्तांच्या मदतीसाठी भाजप सरसावला; रोहा, खांब, मेढा, धाटाव विभागात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

धाटाव : प्रतिनिधी

तौत्के चक्रीवादळाचा तडाखा रायगडसह कोकणाला बसला. या वादळग्रस्तांना आता भाजपने मदतीचा हात पुढे केला आहे. मुबंई भाजप उपाध्यक्ष तथा सायन कोळीवाडा मतदारसंघातील आमदार कॅप्टन आर. तामिल यांनी रोहा तालुक्यातील वादळग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. चक्रीवादळ शमताच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी रायगड जिल्ह्यातील वादळग्रस्त भागाची पाहणी केली. या दौर्‍यादरम्यान वादळग्रस्तांना भाजपाकडून मदतीचा हात दिला जाईल, असे त्यांनी सांगितले होते. तशा सूचनाही पदाधिकार्‍यांना दिल्या होत्या. त्यानुसार आमदार कॅप्टन आर. तामिल यांनी तालुक्यातील रोहा शहर, तसेच खांब, मेढा, धाटाव विभागासह अनेक ठिकाणच्या वादळग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. या वेळी दक्षिण रायगड भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमित घाग, भाजपचे दक्षिण रायगड उपाध्यक्ष राजेश मापारा, रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांभेकर, माजी नगराध्यक्ष सजंय कोनकर यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply