Breaking News

हॅण्डबॉल स्पर्धेला खेळाडूंचा प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर

अ‍ॅमेच्युअर हॅण्डबॉल असोसिएशन रायगडद्वारे आयोजित 12 वर्षांखालील नववी आणि 10 वर्षांखालील दुसरी मुले व मुलींची जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा रविवारी (दि. 14) खांदा कॉलनीतील  सीकेटी महाविद्यालय येथे झाली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील सात शाळांमधून एकूण 24 संघ सहभागी झाले होते.

स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय हँडबॉल खेळाडू श्रीशैला भंडारी हिच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संघटनेचे सचिव देवेंद्र चौगुले, उपाध्यक्ष विनोद नाईक, तसेच संगम डंगर, प्रशांत महल्ले, नितीन घारे, सतीश मोकल, सुशांत जुवळे, गिरीश मोहिते आदी उपस्थित होते.

10 वर्षांखालील मुलांच्या गटात न्यू होरायजन पब्लिक स्कूल पनवेल विजेता आणि सेंट जोसेफ स्कूल खांदा कॉलनी उपविजेता ठरला. मुलींच्या गटात एपीजे स्कूल खारघर विजेता आणि न्यू होरायजन पब्लिक स्कूल पनवेल उपविजेता ठरला. 12 वर्षांखालील मुलांच्या गटात न्यू होरायजन पब्लिक स्कूल पनवेल विजयी आणि सेंट जोसेफ स्कूल खांदा कॉलनी उपविजेता ठरला. मुलींच्या गटात एपीजे स्कूल खारघर विजेता आणि न्यू होरायजन पब्लिक स्कूल पनवेल उपविजेता ठरला.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply