Breaking News

पनवेल तालुक्यात 230 नवे कोरोनाबाधित

चौघांचा मृत्यू; 255 रुग्णांची संसर्गावर मात

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 6) कोरोनाचे 230 नवीन रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू  झाला आहे, तर 255 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 186 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला, तर 202 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 44 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर 53 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.

खांदा कॉलनी सेक्टर 7 नीळकंठ ज्योत सोसायटी, कामोठे सेक्टर 19 कावेरी बिल्डिंग आणि सेक्टर 11 क्षितिज कॉम्प्लेक्स येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी कळंबोलीत 30 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3230 झाली आहे. कामोठ्यात 70 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 4561 झाली. खारघरमध्ये 38 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णसंख्या  4540 झाली आहे.

नवीन पनवेलमध्ये 32 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3801 झाली. पनवेलमध्ये 13  नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3518 झाली आहे. तळोजामध्ये तीन नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 803 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 20,453 रुग्ण झाले असून 18,249 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.22 टक्के आहे. 1729 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 475 जणांचा मृत्यू झाला आहे.

उरण तालुक्यात सात नवे रुग्ण

उरण ः वार्ताहर, प्रतिनिधी

उरण तालुक्यात मंगळवारी (दि. 6) कोरोनाचे सात रुग्ण आढळले आहेत, तर 20 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये म्हातवली स्टार कॉम्प्लेक्स येथील दोन, तर चिरनेर, जेएनपीटी टाऊनशिप, श्रीराम समर्थ सीएचएस उरण, उरण एसटी डेपो डाऊरनगर, कोटनाका श्रीराम अपा. उरण येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये नेव्हल स्टेशन करंजा उरण 14, हरिश्चंद्र पिंपळे, पागोटे, रांजणपाडा, द्रोणागिरी, दत्तकृपा निवास वैभव लक्ष्मी सोसा, बोरी उरण येथील प्रत्येकी एक अशा एकूण 20 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर वशेणी येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1918 झाली आहे. त्यातील 1680 बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 141 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 97 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी महिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

महाडमध्ये दोघांना बाधा

महाड ः प्रतिनिधी

महाड तालुक्यात मंगळवारी (दि. 6) कोरोनाचे दोन नवीन रुग्ण आढळून आले असून, 22 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाच्या दहशतीखाली जगणार्‍या महाडकरांना ही बाब खर्‍या अर्थाने समाधान देणारी आहे. बागआळी विन्हेरेमधील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी महाडमध्ये 22 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. सध्या महाडमध्ये 49 रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत 1555 रुग्ण बरे झाले आहेत. महाड तालुक्यात 1674 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी …

Leave a Reply