Breaking News

महाआघाडीच्या नेत्यांनी बेताल वक्तव्य आणि माथी भडकविण्याचे काम करू नये -आमदार प्रशांत ठाकूर

कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार

पनवेल ः रामप्रहर वृत्त
राज्यात कंत्राटी भरतीचे शंभर टक्के महापाप हे काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बेताल वक्तव्य आणि माथी भडकविण्याचे काम करू नये, असा सल्ला आमदार प्रशांत ठाकूर यांनी महविकास आघाडीला दिला आहे तसेच लोकहिताचे निर्णय घेणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे अभिमान आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्यावर कुणीही आघात केला, तर याद राखा, असा सज्जड दमही त्यांनी विरोधकांना आपल्या भाषणातून दिला.
राज्यात कंत्राटी भरतीचे महापाप काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांनी केले होते. हा लादलेला कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्या अनुषंगाने काँग्रेस, ठाकरे गटाचा निषेध शनिवारी (दि. 21) पनवेलमध्ये आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला. त्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते.
पनवेल शहर व तालुका भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ झालेल्या या आंदोलनास जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, कर्जत तालुकाध्यक्ष राजेश भगत, जिल्हा उपाध्यक्ष प्रिया मुकादम, सुभाष कदम, प्रदीप देशमुख, माजी उपनगराध्यक्ष संदीप पाटील, पनवेल तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, बबन मुकादम, समीर ठाकूर, विकास घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, प्रसाद हनुमंते, नंदकुमार म्हात्रे, प्रितम म्हात्रे, केदार भगत, रुपेश नागवेकर, उत्तर भारतीय सेल संयोजक संतोष शर्मा, आयुष्यमान भारत सेल संयोजक ज्योती देशमाने, बेटी बचाव बेटी पढाव संयोजक आरती तायडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply