मुंबई : प्रतिनिधी
इंडियन प्रीमिअर लीगच्या बाराव्या मोसमात प्ले ऑफ शर्यतीतून बाद होण्याचे सावट डोक्यावर असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने किंग्स इलेव्हन पंजाबला नमवून पहिल्या विजयाची चव चाखली. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने या विजयाचे श्रेय आपल्या पत्नीला म्हणजेचे अनुष्का शर्मा दिले आहे.
’गेल्या वर्षी आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात एक चांगली घटना घडली आणि ती म्हणजे माझे लग्न… या घटनेने माझे आयुष्यच बदलले. माझ्या आयुष्यात एक सुंदर पत्नी आली, सुंदर व्यक्ती आली. तिच्यामुळे जीवनात बरीच सकारत्मकता आली. ती नेहमी मला प्रोत्साहन करीत असते, असे विराट कोहलीने विजयानंतर पत्रकार परिषदेत सांगून आनंद व्यक्त केला.
दरम्यान, कोहली आयपीएल आणि राष्ट्रीय कर्तव्यावर असताना अनुष्का नेहमी त्याच्यासोबत असते. कोहलीला प्रोत्साहन देताना अनेकदा तिला स्टेडियममध्ये पाहिले आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …