Breaking News

नवीन पनवेलमध्ये भीमरायाचा जागर

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त : येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंत्तीनिमित्त रविवारी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून ख्यातनाम गायक आनंद शिंदे यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत बाबासाहेबांना अभिवादन केले.

महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आनंद शिंदे यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन पनवेल महापालिकेचे नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी केले होते. या कार्यक्रमाला महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, अनिल भगत, नितीन पाटील, अ‍ॅड. मनोज भुजबळ, नगरसेविका सुशीला घरत, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, मनिषा चिले यांच्यासह पदाधिकारी, रसिक आणि भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply