Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त गरजू घटकांना मदतीचा हात

पनवेल : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कळंबोली येथे गरजू रिक्षाचालकांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील सर्व गोरगरीब कामगार, मजूर, झोपडपट्टीवाले, आदिवासी यांच्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून अन्नधान्याचे वाटप चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी (दि. 30) कळंबोली येथील सेंट जोसेफ शाळेसमोरील आदर्श रिक्षा स्टँड येथील सर्व वाहनधारकांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले.

या वेळी भाजप भटके-विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष बबन बारगजे, कळंबोली मंडलचे भटके-विमुक्त आघाडीचे अध्यक्ष आबा घुटुकडे, कळंबोली मंडल सरचिटणीस दिलीप बीस्ट, कार्यालय चिटणीस जगदीश खंडेलवाल व रिक्षा नाक्यावरील सर्व चालक वाहक उपस्थित होते. या वेळी रिक्षाचालकांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दीर्घायुष्य मिळावे, अशा शुभेच्छा दिल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी गरजूंना धान्यवाटप करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भाजप रायगड जिल्हा माथाडी कामगार युनियन संघटनेचे उपाध्यक्ष रामदास संपत महानवर आणि महिला व बालकल्याण सभापती तथा नगरसेविका मोनिका प्रकाश महानवर यांच्या सहयोगाने माथाडी कामगारांना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले.

पनवेल ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू आहे. या अनुषंगाने गुळसुंदे पंचायत समिती गणातील सावळे, जाताडे, पोसरी व दापिवली या गावांमध्ये धान्यवाटप करण्यात आले.

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमांतर्गत तालुक्यातील खैरवाडी, फणसवाडी, बोंडलपाडा, तामसई आणि कोंडले येथील गरजू नागरिकांना शनिवारी धान्यवाटप करण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष संजय पाटील, तळोजाचे सरपंच संतोष पाटील, विभागीय अध्यक्ष बाळाराम उसाटकर, उपसरपंच हनुमान खैर, ग्रामपंचायत सदस्य शत्रुघ्न उसाटकर, बोंडालपाडा सरपंच रजनी ढुमणे, कोंडलेचे माजी सरपंच जनार्धन कोळवेकर, फणसवाडी

ग्रामपंचायत सदस्य धर्मा वारगडा, मंगळ्या घुगरे, अनंता वाघ, प्रकाश वारगडा, मंगळ्या वारगडा, पिंटू म्हात्रे, लक्ष्मण शिद, शंकर उघडे, सोमा शिद, किसन सप्रा, किरण पारधी, आंबो पारधी, गोमा सप्रे, मंगेश शिद, अनंता खैर, भाग्यश्री कोळवेकर, रामदास शिंदे, राजेश पांचाळ, बाबू खंडागळे, श्रीराम बडेकर, चांगदेव ढुमणे, चाहू खैर, बुधाजी भगत, शंकर उघडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply