पनवेल ः रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 70वा वाढदिवस आणि स्व. नगरसेवक संजय भोपी यांच्या प्रथम जयंती दिनाचे औचित्य साधून बुधवारी (दि. 2) खांदा कॉलनीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा भासू नये या हेतूने भाजप व संजय भोपी प्रतिष्ठानच्या वतीने सेक्टर 1 येथील रोटरी ब्लड बँकेत त्यांच्या सहकार्याने हा उपक्रम झाला. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक मनोहर म्हात्रे, प्रभाग समिती सभापती समीर ठाकूर, नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेविका सीता पाटील, रूचिता लोंढे, शशिकांत शेळके, शांताराम महाडिक, मोतीलाल कोळी, रामनाथ पाटील, गोपीनाथ मुंडे, सचिन गायकवाड, सचिन मोरे, भीमराव पोवार, खांदा कॉलनी महिला मोर्चा अध्यक्ष राखी पिंपळे, युवा मोर्चा अध्यक्ष रोहित कोळी, आशा मुंडे, आत्मनिर्भर भारतचे जिल्हा संयोजक आकाश भाटिया, मॉर्निंग योगा ग्रुपचे संजय पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …