Breaking News

माथेरान टीमने घेतले लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद

पनवेल : रामप्रहर वृत्त
शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माथेरानच्या टीमने बुधवारी (दि. 2) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट व आशीर्वाद घेतले.
माथेरान नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह राकेश चौधरी, सोनम दाभेकर, प्रतिमा घावरे, रूपाली आखाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम, ज्योती सोनावळे, संदीप कदम, चंद्रकांत जाधव या 10 नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे 14 पैकी 10 नगरसेवकांनी केलेल्या या प्रवेशामुळे शिवसेनेला मोठा झटका बसला आणि त्या अनुषंगाने हा राज्यात चर्चेचा विषय ठरला.
भाजपमध्ये प्रवेश केलेले उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक आणि भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष मंगेश म्हस्कर, युवा नेते किरण ठाकरे, ज्येष्ठ नेते प्रवीण सकपाळ,
प्रदीप घावरे, कुलदीप जाधव, किरण चौधरी, राजेश चौधरी, सचिन दाभेकर, लक्ष्मी चौधरी, गीता जाधव, पूनम सकपाळ, भारती चौधरी, शीतल चौधरी आदी माथेरानच्या टीमने लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबरच आजच्या या शुभदिनापासून आम्ही अधिक जोमाने काम करू, अशी ग्वाही दिली. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख उपस्थित होते.
 

माथेरानच्या टीमने आज भेट घेऊन मला शुभेच्छा दिल्या. या टीमने जास्तीत जास्त विकासगंगा आणावी यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.
-लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची वाढदिवसानिमित्त भेट घेत असताना त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या आशीर्वादातून आम्हाला विधायक कामे करण्याची ऊर्जा मिळाली आहे. आता आम्ही अधिक जोमाने काम करू.
-आकाश चौधरी, उपनगराध्यक्ष

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे दातृत्व आणि कर्तृत्व संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांच्या कार्याची महती दूरवर पोहचली आहे. आम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आजच्या शुभदिनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद घेऊन अधिक जोमाने कामाला सुरुवात करीत आहोत.
-प्रदीप घावरे, ज्येष्ठ नेते  

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply