Breaking News

जेएनपीटीतून रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनच्या साठ्याचे वितरण

उरण : प्रतिनिधी

जेएनपीटी अंतर्गत एपीएम आणि जीटीआय या दोन खासगी बंदरात नुकतेच 41 मेट्रिक टन मेडिकल ग्रेड ऑक्सिजनचा साठा उतरविण्यात आला आहे.

 जेएनपी-एपीएम टर्मिनलमध्ये मेडिकल अ‍ॅक्सेसरीज स्पिंडल वाल्व असलेले ऑक्सिजनचे 250 सिलेंडरचा साठा उतरविण्यात आला आहे.19.50 मे.टनाचा साठा वान हाई लाइन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आयात करण्यात आला आहे.

जेएनपी-जीटीआय टर्मिनल बंदरातूनही जलवाहिनीतील क्रॉजेनिक कंटेनरमध्ये भरलेल्या 19.50 मेट्रीक टन वैद्यकीय ग्रेड ऑक्सिजनचा साठा उतरविण्यात आला आहे.वैद्यकीय ग्रेड ऑक्सिजनचा वापर सद्यस्थितीवरील कोविड-19 साथीच्या आजारावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. त्यामुळे बंदरात उतरविण्यात आल्यानंतर मेडिकल ग्रेड ऑक्सिजनचा साठा तात्काळ आवश्यक ठिकाणी रवाना करण्यात आला आहे.

सध्याच्या लँडिक सिट्युटेशनवर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील रूग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर आणि ऑक्सिजन नियामकांचे मोठ्या प्रमाणात वितरण केले जाते. जेएनपीटीनेही आतापर्यंत एकूण 369.994 एमटी कोविडशी संबंधित वैद्यकीय साधनसामग्री  आणि वैद्यकीय ग्रेड ऑक्सिजनचा पुरवठा केला असल्याची माहिती जेएनपीटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply