Breaking News

पांड्याबरोबरच्या वादाप्रकरणी दीपक हुड्डावर बीसीएची कारवाई

मुंबई : प्रतिनिधी

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून अचनाक माघार घेणे अष्टपैलू दीपक हुड्डाला चांगलेच महागात पडले आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशनने (बीसीए) दीपक हुड्डावर यंदाच्या देशांतर्गत हंगामासाठी निलंबनाची कारवाई केली आहे.

‘दीपक हुड्डा या हंगमात बडोदा संघाचे प्रतिनिधीत्व करणार नाही, असा निर्णय मुख्य परिषदेने घेतल्याची माहिती बीसीएच्या प्रचार समितीचे अध्यक्ष सत्यजित गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांनी दिली. तर बीसीएचे संयुक्त सचिव पराग म्हणाले की, दीपक हुड्डाने स्पर्धेतून माघार घेण्यापूर्वी बीसीएशी चर्चा करायला हवी होती. त्याने अचानक निर्णय घेऊन चूक केली, मात्र त्यासाठी संपूर्ण हंगाम त्याच्यावर बंदी घालणे चुकीचे आहे. त्याला समज देऊन आगामी स्पर्धा खेळण्याची परवानगी द्यायला हवी होती.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply