Breaking News

सफाई कर्मचार्यांना मदतीचा हात; आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पाली : प्रतिनिधी

सलग दोन वर्षे कोरोनाचे संकट आहे. या संकटकाळात फाऊंडेशनने पाली (ता. सुधागड) नगरपंचायतीच्या सर्व सफाई कर्मचार्‍यांना मदतीचा हात दिला आहे. गुरुवारी (दि. 3) आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते या सफाई कर्मचार्‍यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. कोविड संकटामध्ये लाईफ फाऊंडेशनने गेल्या वर्षभरात आत्तापर्यंत सुधागड तालुक्यातील तब्बल सहा हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करून मोठा आधार दिला आहे, असे तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी या वेळी सांगितले. या कार्यक्रमास तहसीलदार दिलीप रायण्णावार, लाईफ फाऊंडेशनचे विनोद लाला व प्रदिप दबडे, भाजपचे दक्षिण रायगड उपाध्यक्ष मारुती देवरे, सुधागड तालुका अध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर, ज्येष्ठ कार्यकर्ते तात्या खंडागळे यांच्यासह पाली नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply