मुरूड : प्रतिनिधी
पर्यावरण नियंत्रण व स्वच्छता फी वसुलीच्या निविदेला लॉकडाऊनमुळे ठकेदारांकडून प्रतिसाद न मिळाल्याने मुरूड नगर परिषदेला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
पर्यटनस्थळ असल्यामुळे मुरूडमध्ये पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. या पर्यटकांकडून नगर परिषद पर्यावरण नियंत्रण व स्वच्छता फीच्या नावाने कर वसुल करते. दरवर्षी मार्च, एप्रिल महिन्यात या कामाचा ठेका काढला जातो. ठेकेदाराचे कर्मचारी कर वसुली करतात. ठेकेदार नगर परिषदेस चार हप्त्यात करवसुलीची रक्कम जमा करतो. त्यामुळे नगर परिषदेच्या खात्यात थेट रक्कम येते व मनुष्यबळसुद्धा वाचते.
यंदा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे नगर परिषदेने पर्यावरण नियंत्रण व स्वच्छता फी वसुलीची निविदा काढली मात्र लॉकडाऊन असल्यामुळे ठेकेदाराने तिला प्रतिसाद दिला नाही. आता संचारबंदीचे नियम शिथील करण्यात आल्यामुळे मुरूडमध्ये पर्यटक येऊ लागले आहेत. त्यांच्याकडून पर्यावरण नियंत्रण व स्वच्छता फी वसुल करण्याचे काम नगर परिषद कर्मचार्यांना करावे लागत आहे.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …