Breaking News

निर्यातीला आले ‘अच्छे दिन’

व्यापार पोहचला 331 अब्ज डॉलरवर

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : भारताच्या गेल्या आर्थिक वर्षातील (2018-19) निर्यात व्यापाराची आकडेवारी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार निर्यात क्षेत्रात भारताला अच्छे दिन आले असून या व्यापारात 9 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे हा व्यवहार तब्बल 331 अब्ज डॉलरपर्यंत पोहचला आहे.

मोदी सरकार सत्तेत आले (2013-14) त्यावेळी निर्यात व्यापाराने नवा विक्रम प्रस्थापित केला होता. त्यावेळी निर्यात 314.4 अब्ज डॉलरवर पोहोचली होती. हा विक्रम मोदी सरकारच्या सरत्या वर्षात मोडला गेला आहे. मार्च 2019मध्ये या निर्यात व्यापारात 11 टक्के वाढ झाली असून, ती 331 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. अभियांत्रिकी, केमिकल आणि फार्मा कंपन्यांची निर्यात उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढल्याने ही वाढ झाली आहे.

वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या या आकडेवारीवर मत व्यक्त करताना ट्रेड प्रमोशन काऊंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंघला म्हणाले की, निर्यात व्यापारात आणखी वाढ होण्यासाठी केंद्र सरकारने खाद्यपदार्थ आणि पारंपरिक वस्तूंच्या निर्यातीवरही लक्ष केंद्रित करायला हवे. आगामी सरकार याबाबत अधिक जागरूक असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

‘फीयो’ या निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष गणेशकुमार गुप्ता म्हणाले की, काही काळापूर्वी निर्यातील अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र ताज्या आकडेवारीनुसार निर्यात व्यापारातील वाढ सकारात्मक आहे. यात आणखी सुधारणा होण्यासाठी सरकारने जीएसटीसह इतर सवलती देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. जागतिक मंदीचा काळ असतानाही चीन आणि दक्षिण पूर्ण आशियाई देशांपेक्षा या क्षेत्रात भारताची कामगिरी उल्लेखनीय ठरल्याचे गुप्ता यांनी म्हटले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply