पनवेल : प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पनवेल महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी प्रत्येक प्रभागांमध्ये विविध ठिकाणी पिंपळ, कडूलिंब, कांचन, बकुळ अशी जवळपास 10-20 झाडे लावण्यात आली. या वेळी वृक्ष लागवडीचा संकल्प करूया, पर्यावरणाचे संरक्षण करूया असा संदेश देण्यात आला. पनवेल प्रभाग समिती ‘ड’ तसेच महापालिका मुख्यालय अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती ‘ड’ सभापती सुशीला घरत, उपायुक्त विठ्ठल डाके, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, उपअभियंता सुधीर साळुंखे,अभियंता राजेश कर्डिले, प्रभाग अधिकारी हरिश्चंद्र कडू, तसेच कर्मचारी उपस्थित होते. खारघर प्रभाग समिती ‘अ’ अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी सभापती अनिता पाटील, नगरसेवक नगरसेवक प्रवीण पाटील, नरेश ठाकूर व प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी, आरोग्य निरीक्षक अजय ठाकूर व सर्व कर्मचारी उपस्थित होते. कळंबोली प्रभाग समिती ‘ब’ अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी सभापती समीर ठाकूर, प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे, आरोग्य निरीक्षक जितू मडवी व सर्व कर्मचारी उपस्थित होते. कामोठे प्रभाग समिती ‘क’ अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला. या वेळी सभापती हेमलता म्हात्रे, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, गोपीनाथ भगत, नगरसेविका हेमलता गोवारी, संतोषी तुपे तसेच सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे प्रभाग अधिकारी अरविंद पाटील, आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे, अतुल वासकर व सर्व कर्मचारी, तसेच कामोठ्यातील नागरिक उपस्थित होते.