Breaking News

खारघरमधील रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरुवात; भाजपच्या पाठपुराव्याला यश

खारघर : रामप्रहर वृत्त

प्रभाग 4 मधील सेक्टर 20 व सेक्टर 21 मधील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत एक पत्र भाजप पदाधिकार्‍यांनी सिडकोला दिले होते. त्यानुसार या रस्त्याच्या कामांना सुरुवात झाली आहे. भाजप पदाधिकार्‍यांच्या पाठपुराव्यामुळे खारघर शहरातील रस्त्यांचे 2019पासून डांबरीकरण करण्यात येत आहे. असे असले तरी शहरातील काही रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेऊन 2021च्या पावसाळ्यापूर्वी त्याही रस्त्यांची डागडुजी करून ते मोटरेबल (कार चालवण्यायोग्य) करावेत यासाठी पाठपुरावा करण्यात आला. या मागणीला अनुसरून खारघरमध्ये अनेक ठिकाणी डांबरीकरणाची कामे चालू झाली आहेत. याच कामांतर्गत सेक्टर 20 व सेक्टर 21 मधील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबतचे पत्र भाजप शहर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल व उपाध्यक्ष दिलीप जाधव यांनी सिडको अधिकार्‍यांना दिले होते. त्यानुसार या कामाची सुरुवात झाली. त्या कामाची पाहणी करून आवश्यक सूचना देण्यात आल्या. पावसाळ्यापूर्वी ही कामे करण्यात येतील, असे सिडको अधिकार्‍यांनी चर्चा करताना सांगितले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply