नागपूर ः महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे बंधनकारक असणार आहे. हा नियम राज्यात 173 कॉलेजेसचे 44 हजार डॉक्टर होऊ पाहणार्या विद्यार्थ्यांना लागू असणार आहे. पहिल्या पेपरपर्यंत शक्य झाले नाही तर दुसर्या पेपरच्या आत मात्र टेस्ट निकाल आणावे लागतील, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सांगितले आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा येत्या 10 जूनपासून घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …