Breaking News

पेण-बोरगाव रस्त्याचे डांबरीकरण

आमदार रविशेठ पाटील यांचा पाठपुरावा

पेण : प्रतिनिधी

पेण शहरापासून अवघ्या दोन किमी अंतरावर असणार्‍या बोरगांव गावाला जोडणार्‍या पेण-बोरगाव रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले होते. त्यामुळे वाहन चालकांना आणि पदचार्‍यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. ही बाब लक्षात घेत आमदार रविशेठ पाटील यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला. त्यानुसार या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले.

पेण-बोरगाव रस्त्यावरील काही किलोमीटरचा रस्ता बांधुन पूर्ण झाल्यापासून पाच वर्षांच्या काळात संबंधित ठेकेदाराला या रस्त्याच्या डागडुजीचा खर्च करायचा असतो, मात्र गेल्या चार वर्षांत या रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती. पेण रिंगरोड बोरगांव हद्दीत स्थानिक लोकांनी याबाबत माहिमी दिल्यानंतर आमदार रविशेठ पाटील यांनी त्यात लक्ष घातले व तातडीने पेण ते बोरगाव खड्डेमय झालेला रस्ता डांबरीकरण करण्यास सुरुवात झाली. त्यानुसार पेण ते बोरगाव रस्ता खड्डेमुक्त होणार असल्याचे या वेळी वैकुंठ पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. लवकरच रस्ता पूर्ण होईल असे वैकुंठ पाटील यांनी सांगितले. सकाळी आणि संध्याकाळी पेण बोरगाव रस्त्यावर शेकडो नागरिक फिरायला या भागात येत असतात. तसेच बोरगाव आणि ग्रामपंचायतीच्या हद्दितील शेकडो नागरिक पेणमध्ये कामानिमित्त याच रस्त्याने ये-जा करीत असतात. यामुळे नगरपरिषदेने पेण बोरगाव रस्ता तातडीने दुरुस्तचे काम हाती घेतले असून त्याचे डांबरीकरण आला आज सुरुवात झाली आहे.

या वेळी बोरगावचे माजी सरपंच नाना महाडिक, मा. नगरसेवक प्रशांत ओक, भाजप युवा नेते सागर पवार, बोरगाव ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ कैवारी, जितु म्हात्रे, अशोक पाटील, दीपक साळुंके आदींसह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply