मुंबई ः प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, ही मागणी स्थानिक स्तरावर जोर धरू लागली आहे. त्यात आता रिपाइं (आठवले गट)पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही या विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्यायला हवे, अशी मागणी करीत आपला पाठिंबा दर्शविला आहे.
या संदर्भात प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नवी मुंबईच्या इतिहासात दि. बा. पाटील यांचे बहुमोल असे योगदान राहिले आहे. नवी मुंबईसाठी ज्या भूमिपुत्रांनी जमीन दिली, त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी जो लढा झाला, त्याचे नेतृत्व ‘दिबां’नी केले होते. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातही ‘दिबां’चे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ओबीसींच्या जागृती व हक्कांसाठी संघटित झालेल्या चळवळीचे ते लढाऊ नेते होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक भूमिपुत्रांची ‘दिबां’चे नाव विमानतळाला देण्याची मागणी रास्त व न्याय्य आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …