Breaking News

अलिबागमध्येही ‘दिबां’च्या नावासाठी जोरदार आंदोलन

अलिबाग : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात उभारण्यात येणार्‍या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी गुरुवारी (दि. 10) अलिबाग येथे मानवी साखळी करण्यात आली. भाजपा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन सादर केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापासून मानवी साखळी तयार करण्यात आली. अ‍ॅड. महेश मोहिते, भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, सतीश लेले, बिपीन महामुणकर, सुनील दामले, अ‍ॅड. पल्लवी तुळपुळे, दर्शन प्रभू, राजेश मापारा, संतोष पाटील, प्रशांत शिंदे आदी या मानवी साखळी आंदोलनात सहभागी झाले होते.अलिबाग येथील भाजपा कार्यालयासमोर सभा झाली. या सभेत अ‍ॅड. महेश मोहिते, मिलिंद पाटील, बिपीन महामुणकर यांची भाषणे झाली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नवे देणे उचित आहे. जोपर्यंत विमानतळाला दिबांच नाव दिल जात नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. हा लढा अधिक तीव्र करू, असे अ‍ॅड. महेश मोहिते यांनी आपल्या भाषणात सांगितले.

आज मानवी साखळी केली. 24 जून रोजी पनवेल, उरण, नवी मुंबई, ठाणे परिसरातील जनता बेलापूर येथील सिडको भवनाला घेराव घालणार आहे. आम्ही त्या दिवशी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालणार.

-अ‍ॅड. महेश मोहिते, अध्यक्ष, दक्षिण रायगड जिल्हा भाजप

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply