Breaking News

‘दिबां’च्या नावासाठी कर्जतमध्ये मानवी साखळी आंदोलनाचा एल्गार

कर्जत : बातमीदार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी   नेरळ ते मानिवली हुतात्मा स्मारकापर्यंत गुरुवारी (दि. 10) मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो भूमिपुत्र, नागरिक, तरुण आणि महिला सहभागी झाल्या होत्या. नेरळ शहरातील हुतात्मा स्मारकात हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. नेरळ हुतात्मा स्मारक ते मानिवली येथील हुतात्मा स्मारक असे सुमारे सात किलोमीटरपर्यंत मानवी साखळी लावून हे आंदोलन करण्यात आले. या वेळी तरुणांनी हातात झेंडे, फलक घेऊन घोषणाबाजीही केली. आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष सावळाराम जाधव, संचालक सुरेश टोकरे, मंगेश म्हसकर, राजेश भगत, अरुण कराळे, बबिताताई शेळके, रमेश मुंढे, मनिषा दळवी, वसंत भोईर, अंकुश दुर्गे, शंकर घोडविंदे, सुनील गोगटे, अशोक ओसवाल, ज्ञानेश्वर भगत, महेश कोळंबे, कृष्णा हाबळे, गोरख शेप, शिवराम तुपे, विजय पाटील, राजू हजारे, वैभव भगत, सुधाकर डायरे, बबलू डायरे, प्रवीण शिंगटे, मनिष राणे, संदीप म्हसकर, विष्णू कालेकर, अतुल चंचे, जयेंद्र कराळे, जयवंत हाबळे याच्यासह हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. गुरुवारी सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 12 पर्यंत नेरळ, साईमंदिर, धामोते, दहिवली, मालेगाव, अवसरे, कोदिवले, मानिवली अशा अनेक ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची सांगता मानिवली येथील हुतात्मा स्मारकात करण्यात आली. त्यानंतर सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने कर्जत तहसीदारांना नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील साहेबांचे नाव देण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply