Breaking News

दिलासा! रायगडातील 251 गावे झाली कोरोनामुक्त

अलिबाग ः प्रतिनिधी
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सूचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी, प्रशासनाने गावपातळीवर राबविलेल्या विविध उपाययोजना यामुळे रायगड जिल्ह्यातील गावे टप्प्याटप्प्याने कोरोनामुक्त होत आहेत. जिल्ह्यातील एक हजार 912 महसूली गावांपैकी 251 गावे कोरोनामुक्त झाली असून या गावांमध्ये सद्यस्थितीत एकही कोरोना रुग्ण नाही. जिल्ह्यासाठी ही आशादायक बाब असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.
रायगड जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळत आहेत. सुरुवातीला पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना रुग्ण आढळले, मात्र त्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळू लागले. ग्रामीण भागातील कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजनांना ग्रामीण भागातील नागरिकांची साथ मिळत असून जिल्ह्यातील गावे टप्प्याटप्प्याने कोरोना मुक्त होत असल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील 810 ग्रामपंचायतींमध्ये एक हजार 912 महसुली गावे असून यामधील 162 ग्रामपंचायतींमधील 251 गावे कोरोनामुक्त झाली आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply