Breaking News

धबधब्यांवर पर्यटकांना नो एण्ट्री

पनवेल : वार्ताहर

पनवेलजवळील पांडव कड्यासह इतर छोट्या मोठ्या धबधब्यांवर पर्यटकांनी वर्षासहलीसाठी येऊ नये, असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे. या संदर्भात खारघर पोलीस ठाण्याकडून सर्व पर्यटकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, खारघरमधील डोंगर भागात पावसाचे पाणी पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे झरे निर्माण होऊन, खारघर परिसरातील पांडवकडा, चाफेवाडी, फणसवाडी, ड्रायव्हिंग रेंज, घामोळे गाव, ओवे कॅम्प डोंगर व धरण परिसर तळोजा जेल समोर डोंगर व तळोजा समोरील तलाव तसेच आजूबाजूच्या परिसरात पावसाचे लहान-मोठे धबधबे चालू होतात. त्यामुळे पावसाळी पर्यटनाचे स्वरूप प्राप्त होते, तेव्हा डोंगरावरून वाहणार्या पाण्यामुळे पांडवकडा, चाफेवाडी,फणसवाडी व ओवे काम धरण व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या धबधबा तयार होतात. तेव्हा या ठिकाणावर दर शनिवार, रविवार, इतर सार्वजनिक सुटीच्या दिवशी पर्यटक या धबधब्याच्या धारेखाली बसण्यासाठी येथे जमा होतात. पाण्याच्या डोहात पोहण्यासाठी जातात तेव्हा पाण्याच्या धबधब्या सोबत डोंगरावरील दगड घरंगळत येऊन धबधब्याखाली बसलेल्या पर्यटकांच्या डोक्यात पडून त्यांना गंभीर दुखापती होतात. बरेचदा परिसरात जमा झालेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक पर्यटक पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे यापूर्वी झालेले आहे. मागील वर्षी चार तरूणी पाण्यात बुडून मृत्यु पावले होत्या. अशा घटना होऊ नये याकरता विशेष कार्यकारी दंडाधिकारी पनवेल विभाग, नवी मुंबई, यांचेकडून यांचेकडून फौजदारी प्रक्रिया सहिताचे कलम 144 प्रमाणे 7 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत.

…अन्यथा कायदेशीर कारवाई

सर्व पर्यटकांना सुचित करण्यात येते की, प्रतिबंधित क्षेत्रात पर्यटन करताना कोणी व्यक्ती मिळून आल्यास त्यांच्यावर खारघर पोलीस ठाण्याकडून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी सांगितले आहे.

Check Also

आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी …

Leave a Reply