Breaking News

धोकादायक वीजवाहिन्यांची दुरुस्ती; नगरसेवक राजू सोनी यांची तत्परता

पनवेल : वार्ताहर

तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा रायगडसह पनवेललाही बसला. यादरम्यान विजेचेही मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर, विजेचे खांब, विजवाहिन्या, डीपी वादळात कोलमडून पडले. नगरसेवक राजू सोनी यांनी तत्परतेने विद्युत महामंडळाने अथक प्रयत्न करून अल्पावधीतच वीजपुरवठा सुरळीत करून घेतला. वादळाच्या तडाख्याने पनवेल शहरातील रोहिदास वाडा याठिकाणी असणार्‍या विजेच्या खांबावरून मुख्य प्रवाह करणार्‍या विजवाहिन्या खाली येऊन लोंबकळत होत्या. त्यामुळे या मार्गावरून लहान-मोठी वाहने जाताना मोठे धोक्याचे ठरत होते. गेल्या आठ ते 10 दिवसांपासून या विजवाहिन्या कमी उंचीवर लोंबकळू लागल्याने याठिकाणी राहणार्‍या लोकांमध्येही घबराट निर्माण झाली होती. याठिकाणी वीजप्रवाह वाहून नेणार्‍या विजवाहिन्यांच्या दोन खांबांमधील अंतर जास्त असल्यामुळे कमी उंचीवर असणार्‍या विजवाहिन्यांमुळे वाहतुकीस आणि स्थानिक रहिवाश्यांसाठी धोकादायक ठरत होते. ही गंभीर समस्या स्थानिक रहिवाश्यांनी नगरसेवक राजू सोनी यांच्या निदर्शनास आणून दिली. नगरसेवक राजू सोनी यांनी समस्या सोडवण्यासाठी पनवेल विद्युत महामंडळाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे, सहाय्यक अभियंता डी के मोरे यांच्याशी संपर्क साधला. त्याअनुषंगाने विजवाहीन्यांच्या दुरुस्तीचे तत्काळ काम करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे भविष्यात उद्भवणारा मोठा धोका टळला आहे. तसेच रस्त्याच्या मधोमध असणार्‍या विजवाहिन्या रस्त्याच्या कडेला विद्युत खांब टाकून सरकवण्यात येणार आहेत. यामुळे विजवाहिन्यांची उंचीही वाढली आहे. नगरसेवक राजू सोनी यांच्या प्रसंगावधानामुळे व कार्यतत्परतेमुळे धोका टळला असून स्थानिकांनी व पनवेलच्या नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

तुटलेल्या चेंबरची झाकणे बदलली

पनवेल शहरातील रोहिदास वाडा कानिफनाथ मंदिरा जवळील रस्त्यावर खुप दिवसापासून चेंबरचे झाकण तुटलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे त्या चेंबरमध्ये पडून अनेक वाहन अडकून खुप छोटे मोठे अपघात होऊन नागरिकांना दुखापत होऊन नुकसान व त्रास सहन करावा लागत होता. याबाबतची माहिती नगरसेवक राजू सोनी यांना स्थानिकांनी देताच त्यांनी त्यांचे सहकारी मंदार देसाई यांना त्या ठिकाणी पाठवून, तसेच कामगार वर्गाला पाठवून त्यांच्या सहाय्याने ते तुटलेले झाकण काढुन त्या जागी नवीन झाकण बसवून घेतले. याबद्दल परिसरातील नागरिकांनी धन्यवाद दिले आहेत.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply