Breaking News

सहादेव बर्डे यांची अपंगत्वावर मात

भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात निवड

रोहे : प्रतिनिधी

तालुक्यामधील वाशी येथील दिव्यांग खेळाडू सहादेव शिवराम बर्डे यांची भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात निवड झाली आहे. चंदिगड येथील युनिव्हर्सिटी ग्राउंडवर  5ते 7 मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या सिलेक्शन कॅम्पमध्ये सहादेव शिवराम बर्डे यांची राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट संघात निवड करण्यात आली.

भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल सहादेव बर्डे यांचे रायगड जिल्हा, रोहा तालुका अपंग संघटना, रायगड जिल्हा दिव्यांग क्रिकेट आसोसिएशन तसेच जिल्ह्याच्या सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply