Breaking News

इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलच्या अध्यक्षपदी साधना धारगळकर

पनवेल : वार्ताहर

इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलच्या झालेल्या पदग्रहण समारंभात अध्यक्षपदी साधना धारगळकर यांची निवड झाली. सेक्रेटरीपदी ममता राजीवन, व्हाईस प्रेसीडेंटपदी डॉ.शितल फरांडे, खजिनदारपदी भूमिका परमार, आयएसओ लता शहा, एडीटर अर्चना राजे, जॉईंट सेक्रेटरी सिध्दी लोखंडे, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर कल्पना कोठारी तर सल्लागार समितीमध्ये अरूणा आचरेकर, सिमा दाहेदार, प्रिती जेटीया, उल्का धुरी, अ‍ॅड. स्नेहल वाडकर यांची निवड करण्यात आली.नवीन वर्षाचे नवीन सदस्य प्रिती जॉर्ज म्हात्रे, शितल ठक्कर, जयश्री साळवे, निता कोटक, कविता ठाकूर, रश्मी माणिकपूर, संविधा पाटकर, मंजुश्री दावकर, विद्या चव्हाण, सीमा बुटाला, सिद्धी मुणोथ, निकिता काळे, शितल वळंजू, सुनिता गुजर, शमा गांधी, निशा बालड यांचे स्वागत करण्यात आले. मावळत्या अध्यक्षा सुनिता आडमुठे यांनी वर्षभर केलेल्या सहकार्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले. नूतन अध्यक्षा साधना धारकर यांनी पुढील वर्षाच्या प्रकल्पाची माहिती दिली. या वेळी गतवर्षीचा अहवाल खजिनदार लता शहा यांनी वाचला तर उपस्थितांचे आभार व्हाईस प्रेसिडेंट शितल फरांडे यांनी मानले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply